Advertisement

"असत्यमेव जयते..." ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट

यासोबतच त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, फ्लॅटबद्दल बोलायचे झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे.

"असत्यमेव जयते..." ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दादरचा एक फ्लॅट आणि अलिबागमधील ८ प्लॉट्सचा समावेश आहे. यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, असत्यमेव जयते.

"मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार, ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं, मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिलं आहे, माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, दबाव टाकणाऱ्यांना मदत केली नाही तर तुमच्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील, तुम्हाला अटकही करु असं पत्र मी नायडूंना लिहिलं होतं, असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मला कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत खचले आहेत असं वाटेल, पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही.

यासोबतच त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, फ्लॅटबद्दल बोलायचे झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे. आता भाजपवाले फटाके फोडत असतील. पण, यातूनच लढण्याची प्रेरणा मिळत असते. या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळले तर मी स्वतः माझी संपत्ती भाजपला दान करेल असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

एवढेच नव्हे, तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल असेही राऊत म्हणाले. माझे राहते घर आणि अलिबागमधील प्लॉट ही तुम्हाला माझी संपत्ती वाटत असेल तर हे चुकीचे आहे. मराठी लोकांच्या बाबतीत आणि महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते अख्ख्या महाराष्ट्राची जनता पाहत आहे. तुमचा बाप जरी खाली आला तर त्याला सुद्धा घाबरणार नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. मी कुणालाच घाबरत नाही असेही राऊत पुढे बोलताना म्हणाले आहेत.



हेही वाचा

ईडी अधिकाऱ्यांवरील ओरोपांची मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, कुटुंबात चिमुकल्याचे आगमन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा