Advertisement

भाजपच्या कार्यक्रमाला गेले शिवसेना खासदार अन्...


भाजपच्या कार्यक्रमाला गेले शिवसेना खासदार अन्...
SHARES

कल्याणमधील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी भाजपाच्या कार्यक्रमात हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजपा आमदाराच्या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदेंची उपस्थिती पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. डोंबिवलीमधील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. पत्रीपुलाजवळील रस्त्याचं सावित्रीबाई फुले नामकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता. अगदी शेवटच्या क्षणी आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे शिंदे म्हणाले. आपण कल्याण पश्चिम येथील एका कार्यक्रमाला जात होतो. मात्र येथे मला भाजप आमदार रवींद्र चव्हाण दिसले. त्यांना पाहूनही पुढे जाणे मला योग्य वाटले नाही आणि म्हणूनच मी थांबलो असे शिंदे यांनी सांगितले. त

सेच “कोरोना संकटाच्या या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्वाचं असताना नागरिक आणि नेत्यांच्या मनात मात्र कोणतंही अंतर असता कामा नये”. श्रीकांत शिंदे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. विशेष म्हणजे एक दिवस आधीच पत्रीपूलाच्या उद्धाटनावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रलंबित विकासकामांवरुन भाजपावर निशाणा साधला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा