अपंग महिलांना मोफत घरघंटी वाटप

 Mumbai A 73
अपंग महिलांना मोफत घरघंटी वाटप

घाटला गाव - चेंबूर परिसरातील घाटला गावात शिवसेनेतर्फे अपंग महिलांसाठी

घरघंटीचे वाटप करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त अपंग महिलांना या घटघंटीचं वाटप करण्यात आलं. स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर आणि चेंबूर एम पश्चिम पालिका विभागनं या मोफत घरघंटीचं वितरण केलंय. आगरी समाज हॉल, घाटला गाव येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी विभागप्रमुख मंगेश सातमकर,महिला विभाग संघटक रिटा वाघ, उपविभाग प्रमुख अविनाश राणे,शाखाप्रमुख उमेश करकेरा,मिनाक्षी पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments