Advertisement

उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कपात नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये पसरल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कपात नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण
SHARES

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये पसरल्या आहेत. गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, 27 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार, मान्यवरांना वर्गीकृत सुरक्षा प्रदान केली जाते.

त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत आहे. रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट देण्यात येत आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कपात केल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहने आणि ‘मातोश्री’ निवासस्थान येथील सुरक्षा देखील कमी करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. पण, कोणत्याही प्रकारची सुरक्षा कपात करण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना ‘झेड’ प्लस आणि आदित्य ठाकरे यांना ‘वाय’ प्लस सुरक्षा आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे बोलले जात होते.

केंद्रीय यलो बुक नियमांनुसार वरील वर्गीकृत सुरक्षा केवळ विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत प्रदान केली जाते. मुंबईच्या विशेष सुरक्षा विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की वर्गीकृत सुरक्षेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केलेली नाही.

याबाबत मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही. त्यांच्या ताफ्यात प्रत्येकी एक अतिरिक्त वाहन होते. ती वाहने हटवली आहेत.”

तसेच निवदेनात म्हटले आहे की, “मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या ज्या व्यक्तींना संरक्षण आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही,” असं पोलिसांनी एका निवेदनात सांगितलं आहे. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.



हेही वाचा

“…तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती,” दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा, फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा