आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या 10 व्या मुंबई महापौर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत यावेळी 14 देशांतील उत्कृष्ट खेळाडू एकमेकांचा सामना करणार आहेत. या स्पर्धेत 29 लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा 4 ते 11 जून या कालावधीत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या माऊंट लिटरटा इंटरनॅशनल स्कूल येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन व्हीस बुद्धिबळ अकादमीने केले आहे. यामध्ये आतापर्यंत 1000 स्पर्धकांपेक्षा अधिक बुद्धिबळपटूंनी नाव नोंदणी केली आहे.
या स्पर्धेत तजाकिस्तानच्या जीएम अमोणोतॉव फारुख (ईएलओ 2632) याला सर्वात वरचे मानांकन देण्यात आले आहे. भारताचा द्वितीय मानांकित जीएम दप्तरण भगवान (ईलओ 2569) आणि पाचवे मानांकनप्राप्त कार्तिकेयन पी (ईएलओ 2502) हे दोघेही भारताचे नेतृत्व करणार आहेत. ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळवली जाईल. मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धा भारतात सर्वात श्रीमंत स्पर्धांमधील एक समजली जाते. यामध्ये प्रत्येक दिवशी एक फेरी असेल. अ गटासाठी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी दोन फेऱ्या खेळवल्या जातील.