कुर्ला - श्री छत्रपति शिवाजी महाराज नेहरूनगर कुर्ला मैदानात स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या वतीनं कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. या सामन्यात एकूण 120 संघांचा समावेश आहे. ज्यात 35 महिला संघ आहेत. 22 नोव्हेंबरला पहिला सिलेक्शन राऊंड होईल त्यानंतर 27 नोव्हेंबरला फायनल मॅच खेेळवली जाईल. सामन्यात सायन, मुलुंड,आणि चुनाभट्टी,मानखुर्दचे संघ देखील सहभाग घेऊ शकतील.