Advertisement

अफलातून, ७१ व्या वर्षी पटकावली 'त्यांनी' ३ सुवर्ण पदकं

कोल्हापूरच्या बाबासाहेब भोगम यांनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करत 'मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र'तर्फे आयोजित ज्येष्ठांच्या धावण्याच्या स्पर्धेत ३ सुवर्ण पदकं पटकावली आहेत.

अफलातून, ७१ व्या वर्षी पटकावली 'त्यांनी' ३ सुवर्ण पदकं
SHARES

कोल्हापूरच्या बाबासाहेब भोगम यांनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्यांनी 'मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र'तर्फे आयोजित ज्येष्ठांच्या धावण्याच्या स्पर्धेत ३ सुवर्ण पदकं पटकावली आहेत. त्यांच्या या अचाट कामगिरीमुळे सर्वचजण थक्क झालेत. ही स्पर्धा मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी ग्राऊंडवर झाली. 

कोल्हापूरचे बाबासाहेब भोगम यांनी १०० मीटरच्या शर्यतीत १६.३ सेकंद इतकी वेळ नोंदवत पहिलं सुवर्णपदक जिंकलं. यामध्ये त्यांनी वसंत सेठिया (१७.३ सेकंद) आणि अनंत निझाई यांना (१८.७) यांना मागे टाकत सुवर्ण पदकावर कब्जा केला.


दुसऱ्या सुवर्णपदकावरही शिक्कामोर्तब

त्यानंतर त्यांनी ८०० मीटरच्या शर्यतीत ३.२४ सेकंदाची वेळ नोंदवत दुसऱ्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं. तर ३००० मीटर शर्यतीत त्यांनी १५ मिनिटांची वेळ नोंदवत रघुनाथ लाड यांना २ मिनिटांच्या फरकाने मागे टाकून तिसरं सुवर्णपदक निश्चित केलं. या शर्यतीत लाड यांनी १७ :०५ मिनिटांची वेळ नोंदवत दुसरं स्थान मिळवलं.


अनेक जेष्ठांनी घेतला सहभाग

ही स्पर्धा ७०, ६५, ५५ आणि ५० या वयोगटात झाली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जेष्ठांनी सहभाग घेतला होता. यावेळी ६५ वर्षांखालील गटात १०० मीटरमध्ये यशवंत तांडेल यांनी बाजी मारली. तर, ५५ वर्षे गटात १०० मीटर प्रकारात शेखर पाटील यांनी बाजी मारली. ५० वर्षांखालील गटात १०० मीटरमध्ये काकासाहेब पाटील यांनी बाजी मारत सुवर्ण पदक मिळवलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा