जलद बुद्धिबळ स्पर्धेत अलैना, वेदांतची विजयी सलामी

  Parel
  जलद बुद्धिबळ स्पर्धेत अलैना, वेदांतची विजयी सलामी
  मुंबई  -  

  जलद बुद्धिबळ स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात राज्य विजेती अलैना विन्सेंटने सिद्धांत डोंगरेच्या राजावर मात करून सलामीचा साखळी सामना जिंकला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमीतर्फे मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या गौरवार्थ परळ येथे ही बुद्धिबळ स्पर्धा खेळवण्यात आली. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सहभागी 152 खेळाडूंच्या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. जगन्नाथराव हेगडे, अकॅडेमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत पार पडला.

  परळ येथील आरएमएमएस सभागृहात सुरू झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत 12 वर्षांखालील गटामध्ये अरेना, कॅन्डिडेट मास्टर वेदांत नगरकट्टेने मंदार क्षीरसागरच्या राजास 14 व्या मिनिटाला जेरीस आणले आणि साखळी सामन्यातील पहिला गुण वसूल केला. अन्य सामन्यात अद्वैत दांडेकरने निनाद चौधरीचा, अनिश जोशीने रोनक आनंदचा, ओमकार चव्हाणने शिवम शायचा, ओमकार शिर्केने रोहन डारचा, देव शाहने सोहम पाटणकरचा, वेद आंब्रेने अमेय घरतचा आणि ईशान सावंतने विराज भिवंडकरचा पराभव करून साखळीत एक गुण मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.