चेंबूरमध्ये कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन

 Chembur
चेंबूरमध्ये कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन
Chembur, Mumbai  -  

चेंबूर येथील घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळातर्फ 47 व्या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावदेवी क्रीडांगणात 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा तर महिलांसाठी पाककला, रांगोळी स्पर्धा, सुईत धागा ओवून धावणे, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय गायन स्पर्धा, जनरल नॉलेज, कॅरम स्पर्धा, वेशभूषा, समूह नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. 

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांस 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विनायक पाटील,किशोर पाटणकर,चारुदत्त ठाकूर यांनी दिली आहे.

Loading Comments