Advertisement

बास्केटबाॅल नेटवर्कची पोदारवर मात


बास्केटबाॅल नेटवर्कची पोदारवर मात
SHARES

युवा गुणी बास्केटबाॅलपटूंचा भरणा असलेल्या बास्केटबाॅल नेटवर्क या संघाने कोणताही सराव न करता दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत पोदारचा ४५-३१ असा पराभव केला.

अाग्रीपाडा येथे सुरू असलेल्या मस्तान वायएमसीए बास्केटबाॅल स्पर्धेत बास्केटबाॅल नेटवर्क संघाने अाक्रमक खेळाचे प्रदर्शन करत चेंडूला जाळ्यात धाडण्यात यश मिळवले. मात्र प्रदीर्घ काळ त्यांना अापल्या कामगिरीत सातत्य राखता अाले नाही. पण तरीही १४ गुणांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवत अागेकूच केली.


एनबीएची शानदार सुरुवात

नागपाडा बास्केटबाॅल असोसिएशन (एनबीए) संघाने शानदार सुरुवात करताना टीम ३६० चा ८४-४६ असा ३८ गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला. अन्य सामन्यांत, वांद्रे वायएमसीए संघाने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनवर ४७-२५ अशी मात केली. मुलांच्या गटात, इंडियन जिमखाना संघाने यजमान मस्तान वायएमसीए संघावर २७-२१ असा निसटता विजय मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा