नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन

wadala
नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन
नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन
नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन
नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन
See all
मुंबई  -  

वडाळा - प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर पटांगणात नमो श्री 2016 शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती. शनिवारी सायंकळी 7 ते 10 या वेळेत ही स्पर्धा पार पडली. भाजपा शाखा क्रमांक 178च्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 55,60,65,70,75,80 आणि 80 किलोवरील वजनी गटांचा समावेश होता. तर प्रत्येक वजनी गटांतून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी अशी पारितोषिकं देण्यात आली. स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धा. 60 किलो वजनी गटात दिव्यांग स्पर्धकांचा समावेश होता. तर उत्कृष्ठ सादरीकरण करून या गटातील ५ स्पर्धकांनी पारितोषिक पटकावलं.

विठ्ठल व्यायामशाळा ट्रस्ट, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन, मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र आणि मुंबईतील नामवंत बॉडी बिल्डर्स स्पर्धकांनी इथं हजेरी लावली होती. तसंच कार्यक्रमाला भाजपा शाखा क्रमांक 178चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.