चेंबूरच्या शाळेचं सोनिपतमध्ये यश

  Chembur
  चेंबूरच्या शाळेचं सोनिपतमध्ये यश
  मुंबई  -  

  मुंबई - राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चेंबूरच्या स्वतंत्र सैनिक नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

  या विद्यार्थ्यांनी तब्बल 3 सुवर्ण तर 10 रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राला सांघिक द्वितीय स्थान मिळवून दिले. हरियाणातल्या सोनिपत येथे 5 ते 10 जानेवारी दरम्यान 62 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऋतुजा जगदाळे, ऋतुजा घाग, आचल गुरव या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले. तर अर्ना पाटील, रितिका महावर, शुभम रहाटे यांनी रौप्य पदक पटकावले आहे.

  प्रशिक्षक राहुल ससाणे यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मोतीलाल योगेश पवार, ज्योती शिंदे जिल्हा पुरस्कार प्राप्त सोनाली बोराडे हे सध्या विद्यार्थ्यांसोबत हरियाणात असून 10 जानेवारीपर्यंत आणखीन पदके मिळतील असा त्यांचा विश्वास आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.