Advertisement

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स असोसिएशननं पटकावली पोलीस शील्ड


डी. वाय. पाटील स्पोर्ट्स असोसिएशननं पटकावली पोलीस शील्ड
SHARES

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या डाॅ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स असोसिएशननं पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा 53 धावांनी पराभव करून पोलीस शील्ड क्रिकेट स्पर्धेचं जेतपद पटकावलं. माजी कसोटीपटू माधन अापटे यांच्या हस्ते विजेत्या संघाला एक लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात अालं.


डी. वाय. पाटीलचा धावांचा डोंगर

मुंबई पोलीस जिमखाना  ग्राउंडवर रंगलेल्या तीन दिवसांच्या या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटीलनं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 446 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा डाव 88.3 षटकांत 392 धावांवर संपुष्टात अाणत डी. वाय. पाटीलनं पहिल्या डावात 54 धावांची अाघाडी घेतली होती. पय्याडेच्या पराग खानापुरकर यानं 161 धावांची खेळी करत प्रतिकार केला. प्रफुल वाघेला (42), हरमीत सिंग (32), राहुल लाड (31) यांनी त्याला चांगली साथ दिली. पण प्रशांत भोईर (4 विकेट्स), प्रवीण तांबे (3 विकेट्स) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पय्याडेला अाघाडी घेण्यात अपयश अालं.


दुसऱ्या डावात डी. वाय. पाटीलच्या 246 धावा

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स असोसिएशननं दुसऱ्या डावांत 246 धावा केल्या. पहिल्या डावातील अाघाडीच्या बळावर त्यांनी पय्याडेसमोर विजयासाठी 300 धावांचं अाव्हान ठेवलं. पण प्रवीण तांबे अाणि इक्बाल अब्दुल्ला (प्रत्येकी चार विकेट्स) या फिरकीपटूंसमोर पय्याडेचा डाव 247 धावांवर संपुष्टात अाला. दोन शतकांसह एक अर्धशतक झळकावणारा डी. वाय. पाटीलचा शुभम रांजणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा