Advertisement

चेन्नई सुपर किंग्समध्ये धोनी परतण्याचा मार्ग मोकळा


चेन्नई सुपर किंग्समध्ये धोनी परतण्याचा मार्ग मोकळा
SHARES

महेंद्रसिंग धोनी अाणि चेन्नई सुपर किंग्स हे जणू समीकरणच बनलं होतं. तब्बल अाठ वर्षं चेन्नईकडून खेळताना धोनीनं अापल्या संघाला दोन जेतेपदं पटकावून दिली होती. पण फिक्सिंगच्या कारणामुळे चेन्नई संघ दोन वर्षे अायपीएलमधून बाहेर पडला अाणि धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्सने करारबद्ध केलं. अाता शिक्षेनंतर चेन्नई संघ परतला असून महेंद्रसिंग धोनीही अापल्या या जुन्या संघात परतण्यासाठी सज्ज झाला अाहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नई संघाच्या कर्णधारपदी विराजमान होईल, अशी चिन्हे अाहेत.


तीन खेळाडू करता येणार रिटेन

अायपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बुधवारी झालेल्या बैठकीत प्रत्येक फ्रँचायझीला तीन खेळाडू अापल्या संघात रिटेन करता येणार अाहेत. अाणखी दोन खेळाडूंना राइट टू मॅच या रूपाने ठेवता येईल. जर या खेळाडूंपैकी एकावर बोली लागली तर अापला राइट टू मॅच अधिकार वापरून त्यांच्यावर लागलेल्या बोलीची रक्कम देऊन त्यांना अापल्या संघात विकत घेता येईल.


फेब्रुवारीमध्ये होणार लिलाव

अायपीएलच्या या 11व्या पर्वाचा लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार अाहेत. खेळाडूंसाठी बोली लावताना यापूर्वी प्रत्येक संघाला 66 कोटी रुपये खर्च करता येत होते. अाता ही रक्कम वाढवण्यात अाली असून ती 80 कोटी रुपये इतकी करण्यात अाली अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement