इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीची उत्कृष्ट कामगिरी


SHARE

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने उत्कृष्ट कामगिरी केली. धोनीने 40 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावा ठोकल्या. धोनीच्या सोबतीला युवराजने 48 चेंडूत 56 धावा केल्या. यामध्ये त्याने सहा चौकार आणि 2 षटकार मारले. तर अंबाती रायडूचं शतक, शिखर धवनच्या 63 धावांमुळे भारताच्या अ संघाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगला. भारताकडून सलामीसाठी मनदीप सिंह आणि शिखर धवन आले. मनदीप 8 धावा करुन माघारी परतला. तर धवनने 84 चेंडूत 63 धावा केल्या. अंबाती रायडूने 97 चेंडूत 11 चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने शतक झळकावलं.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि इंग्लंड संघांमधल्या सराव सामन्यातसाठी मोठी गर्दी उसळली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात भारत ‘अ’ संघाचं नेतृत्त्व करतो आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याचा धोनीचा हा अखेरचा सामना आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या