Advertisement

महापौर चषक स्पर्धेत ‘विटी दांडू’चा समावेश


महापौर चषक स्पर्धेत ‘विटी दांडू’चा समावेश
SHARES

मुंबई - महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०१६-१७ मध्ये सहभागी होणा-या विविध क्रीडा संघटनांना आता पालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्याची सुविधा महापालिकेने सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी या संदर्भाची बैठक पार पडली. महापौर चषक क्रीडा स्पर्धेत ३८ खेळांचा समावेश होता. या स्पर्धेत आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा विटी दांडू खेळाचा समावेश करण्यास मंजुरी मिळाली आहे.
या वर्षापासून बृहन्मुंबई क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडू, महिला आणि पुरुष क्रीडा मार्गदर्शक (प्रशिक्षक / शिक्षक), उत्कृष्ट क्रीडा संघटक, कार्यकर्ता, विविध खेळांच्या असोसिएशनचे मुख्य अध्यापक आणि क्रीडा अधिकारी, शारीरिक शिक्षक, माध्यमिक / प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि राज्य, राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा