Advertisement

प्रसिद्धीसाठी गोविंदा पथकांनी घेतला सोशल मीडियाचा आसरा

गोविंदा पथकांनी आपल्या पथकाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा आसरा घेतला आहे.

प्रसिद्धीसाठी गोविंदा पथकांनी घेतला सोशल मीडियाचा आसरा
SHARES

गोकुळाष्टमी दिवशी मुंबईसह राज्यभरात उंचच उंच दहीहंड्या बांधल्या जातात. दहीहंडीपर्यंत थर लावून हंडी फोडण्याची स्पर्धा सर्व ठिकाणी घेतली जाते. तर बेभान होऊन नाचणारी आणि थरावर थर चढवणारी तरुणाई... हे दृश्य मुंबईत दरवर्षी पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे, जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला प्रथम पारितोषिक दिलं जातं. मात्र, सध्या गोविंदा पथकांनी आपल्या पथकाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा आसरा घेतला आहे.


फेसबुक पेज केलं तयार

मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी इतरांपेक्षा आपल्या पथकाची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी फेसबुकवर पेज तयार केले आहेत. या पेजेसवर त्यांना आपल्या गोविंदा पथकाचे फोटो, थर लावलेले फोटो शेअर केले आहेत.


'या' गोविंदा पथकांनी बनवलं पेज

मुंबईतील जय जवान गोविंदा पथक (जोगेश्वरी), बालविर गेविंदा पथक (चेंबूर), संगम गोविंदा पथक (वांद्रे पुर्व), वक्रतुंड गोविंदा पथक (वडाळा प.), श्री साई गोविंदा पथक, डोंगरी गल्ली गोविंदा पथक, साईनाथ गोविंदा पथक यांसारख्या अनेक गोविंदा पथकांनी फेसबुकवर पेज बनवलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा