Advertisement

जागतिक क्रमवारीत अव्वल ५ जणांमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार- एच एस प्रणॉय


जागतिक क्रमवारीत अव्वल ५ जणांमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार- एच एस प्रणॉय
SHARES

जागतिक क्रमवारीत सध्या १०व्या क्रमांकावर असलेला भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयला आता जागतिक रँकिंगमध्ये टॉप-5 मध्ये मजल मारण्याचे वेध लागले आहेत. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पीबीएल लीगच्या अहमबदाबाद स्मॅश मास्टर संघाच्या पत्रकार परिषदेत प्रणॉयने आपल्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. ‘आता मला अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. सुपर सीरिजसारख्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून जेतेपदांवर नाव कोरल्यास मला रँकिंगमध्ये वरचे स्थान मिळवण्याची संधी मिळेल,’ असे प्रणॉयने सांगितले.

गेल्या वर्षात मी अनेक स्पर्धांमध्ये खेळलो आहे. त्यामुळे आता विश्रांती घेणे खूपच गरजेचे आहे. पुढील मोसमापासून मला अनेक स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धां यांसारखी आव्हाने मला पेलावी लागणार आहेत. आता पीबीएलनंतर मलेशिया आणि इंडोनेशियन सुपर सीरिज स्पर्धा आणि लगेचच इंडिया सुपर सीरिज स्पर्धा येऊन ठेपली आहे. जर रँकिंगमध्ये सुधारणा करायची असल्यास, मला या सर्व स्पर्धांमध्ये खेळावे लागेल. त्यामुळे माझ्या तंदुरुस्तीची कसोटी लागणार आहे.

पीबीएल कधी?

प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) २३ डिसेंबर  ते १४ जानेवारीदरम्यान पाच शहरामध्ये खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत एच. एस. प्रणॉय, किदम्बी श्रीकांत, सायना नेहवाल, ताय झू यिंग, कॅरोलिना मारिन, विक्टर अक्सेलसेन, पी. व्ही. सिंधू, संग जी यून, अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुत्ता यांसारखे दिग्गज बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा