बिलियर्ड्स लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना विजयी

Chembur
बिलियर्ड्स लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना विजयी
बिलियर्ड्स लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना विजयी
See all
मुंबई  -  

बीएसएएम चेंबूर जिमखाना बिलियर्डस् लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. शनिवारी चेंबूर जिमखाना बिलियर्ड्स हॉलमध्ये झालेल्या प्री क्वॉर्टर फायनलमध्ये हिंदू जिमखानाने गरवारे क्लबला 552-500 अशा फरकाने हरवले.

हिंदू जिमखान्याचे रोविन डिसोझा, सिद्धार्थ पारीख आणि चेतन हेमादी यांनी अनुक्रमे चिराग मेहता, अमर पारीख आणि सोमैल करकेरा यांना पराभवाची धूळ चारत विजय साध्य केला. सिद्धार्थच्या चांगल्या खेळामुळे संघाला विजयासाठी उत्तम पाठबळ मिळाले. इतर सामन्यात एल्फिन्स्टन सीसीने शिवाजी पार्क जिमखाना संघाला 644-592 अशा गुण संख्येने पराभूत केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.