Advertisement

नंदू नाटेकर भारतीय बॅडमिंटनचं ज्ञानपीठ - वाडेकर


नंदू नाटेकर भारतीय बॅडमिंटनचं ज्ञानपीठ - वाडेकर
SHARES

दादर - नंदू नाटेकर म्हणजे भारतीय बॅडमिंटनचं ज्ञानपीठच, असे गौरवोद्गार अजित वाडेकर यांनी काढले. युनिव्हर्सल स्पोर्टस् अॅन्ड आर्ट्स फाउडेशन आणि स्वरा आर्ट्सच्या वतीनं बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी सायंकाळी दादरच्या सावरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

नंदू नाटकेर या नावाचा उल्लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मानाचं स्थान मिळवून देणारे बॅडमिंटनपटू असाच केला जातो. वयाची तब्बल 60 वर्षे बॅडमिंटनला देणाऱ्या नंदू नाटेकर यांच्या बॅडमिंटन प्रवासाचा आढावा घेण्यासाठी द्वारकानाथ संझगिरी आणि श्रीकांत वाड यांनी नंदू नाटेकर यांची मुलाखत घेतली. या वेळी नाटेकर यांच्यासाठी स्वरा आर्ट्सच्या वतीनं एक संगीतमय संध्याकाळ या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड, माधवराव आपटे, अजित वाडेकर, बॅडमिंटनपटू अमी घिया शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र, शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन अजित वाडेकर यांच्या हस्ते नंदू नाटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वाडेकर यांनी नाटेकर यांच्यासोबतची मैत्री, त्यांच्याकडून शिकता आलेले वेगवेगळे गुण, महाविद्यालयातल्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement