आयसी युनायटेड आणि चॅलेंजर्समधील सामना बरोबरीत

  Borivali
  आयसी युनायटेड आणि चॅलेंजर्समधील सामना बरोबरीत
  मुंबई  -  

  बोरीवली प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात आयसी युनायटेड आणि चॅलेंजर्समध्ये सामना बरोबरीत झाला. 2-2 ने हा सामना बरोबरीत झाला. सुरुवातीला 0-2 अशा फरकाने आघाडीवर असलेल्या आयसी युनायटेड संघाला टक्कर देत एफसी संघाने 2-2 ने सामना बरोबरीत रोखला. ही स्पर्धा बोरीवलीच्या सेंट फ्रान्सिस डिसीस ग्राऊंडवर पार पडली. 

  या स्पर्धेत चॅलेंजर्सच्या वेन त्रिनिदाडे आणि डग्लस सोआरेस या दोघांनी प्रत्येकी एक एक गोल करत संघाला बरोबरीत आणले. दरम्यान, त्याआधी झालेल्या सामन्यात गतविजेत्या टायगर स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि मिलन क्लब विरूद्धच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये शून्य गोल संख्येवर सामना बरोबरीत झाला. विशेष म्हणजे दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.