Advertisement

आयडीबीआय वेंगसरकर अकादमीने पटकावला टोटल कप


आयडीबीआय वेंगसरकर अकादमीने पटकावला टोटल कप
SHARES

ओव्हल मैदानात झालेल्या टोटल कप १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आयडीबीआय वेंगसरकर अकादमीने विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत त्यांनी विरारच्या साईनाथ स्पोर्ट्स क्लबवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळविला. ५० चेंडूत सर्वाधिक ६५ धावांची खेळी करणारा कर्णधार नूतन गोएल हा अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

आयडीबीआय वेंगसरकर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना नूतन गोएल (६५) आणि वरून रागजी (३४) यांच्या दमदार खेळीमुळे निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा उभारल्या. साईनाथ स्पोर्ट्स क्लबकडून क्रिस्टल मेनेझिस याने १४ धावत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या आयुष वर्तकने ५३ धावांची खणखणीत खेळी साकारली. आयुष बाद झाल्यानंतर साईनाथ संघाचा डाव १६.३ षटकात ९१ धावांत गडगडला. आदित्य परबने १३ धावात ३ बळी मिळवत वेंगसरकरच्या यशात मोलाचा वाटा उचलला. भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर तसेच टोटलचे दीपक जोशी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.


 संक्षिप्त धावफलक 

आयडीबीआय वेंगसरकर अकादमी – २० षटकांत ७ बाद १५२ ( नूतन गोएल ६५, वरून रागजी ३४ ; क्रिस्टल मेनेझिस १४/२) वि. वि. साईनाथ स्पोर्ट्स क्लब (विरार) - १६.३ षटकांत सर्व बाद ९१ (आयुष वर्तक ५३, आदित्य परब १३/३). सामनावीर – नूतन गोएल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा