Advertisement

मुंबई ओपन स्पर्धेत भारताच्या ऋतुजाचा पराभव


मुंबई ओपन स्पर्धेत भारताच्या ऋतुजाचा पराभव
SHARES

एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसलेला सरळ सेटमधील पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत 271 व्या स्थानी असलेल्या 23 वर्षीय इस्राईलच्या क्वॉलिफायर डेनिझ खाझानिऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुजाचा 6-4, 6-3 ने पराभव झाला आहे.


पण सामना गमावला

पहिल्या सेटमध्ये सुरुवातीच्या सहा गेम्समध्ये दोघांमध्ये 3-3 अशी बरोबरी होती. पण, डेनिझने सातव्या गेममध्ये चमक दाखवत 4-3 अशी आघाडी घेतली. यानंतर आपली आघाडी तिने 5-3 अशी वाढवली. अमेरिकेहून खेळून परतलेल्या ऋतुजाने नवव्या गेममध्ये चमक दाखवत सामना 5-4 अशा चुरशीच्या अवस्थेत आणला. पण, दहाव्या गेममध्ये कोणतीही चूक न करता डेनिझने विजय नोंदवत पहिला सेट 6-4 ने आपल्या नावे केला.

दुसऱ्या सेटमध्ये डेनिझने सुरुवातीलाच 4-0 अशी आघाडी घेतली होती. त्याला ऋतुजानेही उशिरा का होईना टक्कर दिली. पण तिने हा सामना 6-3 ने गमवाला. भारताच्या चार वाईल्ड कार्ड प्रवेशामधील ऋतुजा ही तिसरी भारतीय खेळाडू असून पराभवामुळे तिला  बाहेर पडावे लागले. सोमवारी करमन कौर थंडी आणि झील देसाई यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता.


या सामन्यात फ्रान्सची खेळाडू विजयी

यापूर्वी झालेल्या सामन्यात फ्रांसच्या अमानदीन हेसेने ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित अरिना रोडिओनोवा हीला पराभूत केले. 24 वर्षीय फ्रेंचची खेळाडू पहिल्या सेटमध्ये 2-5 अशी पिछाडीवर होती. पण, पुढच्या चारही गेममध्ये विजय नोंदवत तिने पुनरागमन केले आणि 6-5 अशी आघाडी मिळवली. अरिनाने 11 गेम जिंकत सामना टायब्रेकरपर्यंत नेला. यामध्ये अमानदीनने 7-2 अशी बाजी मारत पहिला सेंट 7-6(2) असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अमानदीनने चमक दाखवत प्रतिस्पर्धी खेळाडूला 6-3 असे नमवत विजय नोंदवला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा