चेंबूर क्रीडा केंद्राच्या पोरी हुश्शार...

  Chembur
  चेंबूर क्रीडा केंद्राच्या पोरी हुश्शार...
  मुंबई  -  

  चेंबूर - येथील चेंबूर क्रीडा केंद्र संघानं नवशक्ती क्रीडा मंडळाचा 36-20 असा धुव्वा उडवत मुलुंड क्रीडा केंद्र कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाचं जेतेपद पटकावलं. त्याचवेळी पुरुषांच्या ‘अ’ गटात भांडुपच्या उत्कृष्ट मंडळानं घाटकोपरच्या वीर परशुराम क्रीडा मंडळाचा 25-18 असा पराभव करून बाजी मारली.

  मुलुंड क्रीडा केंद्र आणि सुराज फाउंडेशनच्या वतीनं आर. आर. कॉलेज मैदानावर झालेल्या या स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्राच्या अभिलाषा म्हात्रे, पल्लवी बोडे यांनी आक्रमक खेळ करताना नवशक्तीच्या आव्हानातली हवा काढली. तर, नवशक्तीकडून बेबी जाधवने अपयशी झुंज दिली.
  पुरुषांच्या ‘अ’ गटात सुरुवातीपासून वर्चस्व राखलेल्या उत्कृष्ठ मंडळानं अखेरपर्यंत पकड कायम राखताना वीर परशुराम क्रीडा मंडळाचं आव्हान सहज परतवून लावलं. तर, पुरुषांच्या ‘ब’ गटात मी मुंबईकर (घाटकोपर) संघानं जेतेपद मिळवताना देऊळवाडी क्रीडा मंडळ (मुलुंड) संघाचा 32-16 असा पराभव केला. विजयी संघाच्या नितेश वांदरेनं चढाईत चमकदार कामगिरी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.