Advertisement

कुरारमध्ये रंगली आंतरशालेय कबड्डी स्पर्धा


कुरारमध्ये रंगली आंतरशालेय कबड्डी स्पर्धा
SHARES

मालाड - कुरारगाव येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी मैदानात आंतरशालेय कबड्डी स्पर्धा रंगली. शनिवार आणि रविवार या दोन दिवसीय कुरार विलेजमधील आनंदवाडी येथील जिजामाता विद्यामंदिराच्या मुलींच्या गटाने आणि पुष्पापार्कमधील उत्कर्ष विद्यामंदिराच्या मुलांच्या गटाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. सोमवारी विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. अविनाश साळकर फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मालाड, दिंडोशी विभागातील दहा शाळांच्या मुला-मुलींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार सुनील प्रभू, नगरसेवक प्रशांत कदम, भोमसिंग राठोड, सायली वारिसे, युवा सेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना विभाग अधिकारी रुपेश कदम यांनी उपस्थिती लावली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement