SHARE

लश्करिया लिटील चॅम्पच्या तिसऱ्या सत्राला रविवारी 16 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. शहरातील विविध विभागात ही लीग होणार आहे. हे सामने शिवाजीपार्क,गोरेगाव स्पोर्ट्स क्लब,पायदे ग्राऊंड कांदीवली,एमआयजी वांद्रे आणि मुंबईच्या इतर भागात खेळवले जाणार आहेत. 14 वर्षांखालील मुलांनी यात सहभाग घेतला आहे. पहिल्या सत्रात सहा संघांनी भाग घेतला असून, यामध्ये 14 खेळाडू खेळले असून, यामध्ये 3 दिव्यांग खेळाडूंनीही सहभाग घेतला होता.

पहिल्या सत्रात राहुल द्रविड याचा मुलगा समित द्रविड आरएक्ससीए संघातून खेळला होता. भारतातील क्रिकेटला चांगले खेळाडू मिळावे म्हणून या लीगचा उद्देश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या