Advertisement

'खेलो इंडिया' खो-खो स्पर्धेत दिल्लीत घुमला महाराष्ट्राचा अावाज


'खेलो इंडिया' खो-खो स्पर्धेत दिल्लीत घुमला महाराष्ट्राचा अावाज
SHARES

दिल्ली इथं रंगलेल्या पहिल्यावहिल्या 'खेलो इंडिया' खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा अावाज घुमला. या शालेय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघांनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातवर ७-६, अशी एक गुण अाणि ५.१७ मिनिटे राखून दणदणीत मात करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचे आव्हान (१०-४,१-६) ११-१० असे परतवून लावत सुवर्णपदक पटकावले.


महाराष्ट्राच्या मुली ठरल्या सरस

अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी पहिल्या डावात अाघाडी घेतली होती. त्यानंतरही सरस खेळ करत मुलींनी विजेतेपद खेचून अाणले. महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने पहिल्या डावात ९ पैकी ४ मि व दुस-या डावात २.५० मि. संरक्षण केले. प्रतिक्षा खुरंगे (२.५० मि व ३ मि), प्राची जटनुरे (१.४० मि व १ मि) व दीक्षा सोनसुरकर (४ गडी) यांनीही छान खेळ केला. छान साथ दिली. गुजरातच्या निलम गंगाडियाने पहिल्या डावात ३.३० मि संरक्षण केले.


मुलांमध्ये निहार दुबळेची सुरेख कामगिरी

मुलांमध्ये महाराष्ट्राने केरळवर सुरुवातीपासूनच अधिराज्य गाजवले. महाराष्ट्राच्या विजयात निहार दुबळेने मोलाची कामगिरी बजावली. त्याने निहार दुबळे (२.३० मि व १.४० मि) तर आदर्श मोहिते (२.३० मि) व संदेश जाधव (२मि व ३ गडी) यांनी सुरेख खेळ करत विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा