Advertisement

क्रीडा संकुलावर खर्च केलेला पैसा धुळीत


क्रीडा संकुलावर खर्च केलेला पैसा धुळीत
SHARES

जोगेश्वरी - जागोजागी पसरलेला कचरा, उकिरडा, शौचालयात पसरलेली घाण. तर भिंतींवर रंगवण्यात आलेले अश्लिल चित्र. हे चित्र आहे जोगेश्वरीतल्या बेहरामबागमधल्या माँ साहेब मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलाचं. हे क्रीडा संकुल २००७ ते २००१२ दरम्यान तत्कालीन नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आले होते. या क्रीडा संकुलाची दुरवस्था झालीय. हे संकुल म्हणजे डंपिंग ग्राउंड झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. पण आतापर्यंत कुणीही याची दखल घेतली नाही. यावरून पालिकेसोबतच राजकीय नेत्यांनाही संकुलाचा विसर पडल्याचं दिसून येतंय.

संबंधित विषय
Advertisement