मिलिंद सोमणने पटकावला नवा खिताब

  Mumbai
  मिलिंद सोमणने पटकावला नवा खिताब
  मुंबई  -  

  मुंबई - अभिनेता मिलिंद सोमण याने आयर्नमॅन नंतर आणखीन एक खिताब आपल्या नावावर केला आहे. फ्लोरिडामधली अल्ट्रामॅन स्पर्धा मिलिंद सोमणने पूर्ण केली आहे. एकूण 517.5 किलोमीटरची ही स्पर्धा 3 दिवस चालते. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला 10 किलोमीटर स्विमिंग, 423 किलोमीटर बाईकिंग आणि 84 किलोमीटर रनिंग पूर्ण करणे आवश्यक असते.

  ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते. यामध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर स्विमिंग आणि 142 किलोमीटर बाइकिंग करावी लागते. दुसऱ्या दिवशी 276 किलोमीटर बाइकिंग तर तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंन करणे आवश्यक असते.

  यावेळी मिलिंद सोमण सोबतच अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रेडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमढ रेब्बा या चार भारतीयांना या स्पर्धेत भाग घेतला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.