मुलुंड जिमखान्याचा पलावावर दणदणीत विजय

 Mulund
मुलुंड जिमखान्याचा पलावावर दणदणीत विजय

अंडर 16 टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मुलुंड जिमखान्याने पलावा सीटी डोंबिवली पूर्वचा दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुलुंड जिमखानाच्या संघाने 20 षटकांत चार गडी गमावत 248 धावा ठोकल्या. मात्र 249 धावांचा पाठलाग करताना पलावाचा संघ गडगडला आणि मुलुंड जिमखान्याने हा सामना 174 रन्सनी खिशात घातला. 54 चेंडूंत शतक करणाऱ्या अमोघ कार्तिकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Loading Comments