फुटबॉल स्पर्धेत 'मुंबई जिल्हा एफए'ची बाजी

 Mumbai
फुटबॉल स्पर्धेत 'मुंबई जिल्हा एफए'ची बाजी

मुंबई - कायरा अग्रवाल आणि साई संखे या दोघांनी शानदार खेळी करत महाराष्ट्र राज्य अांतरजिल्हा ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेत 'मुंबई जिल्हा एफए'ने 'ठाणे जिल्हा एफए'ला 5-1 अशी मात दिली. फुटबॉल चॅम्पियनशिप 2016-2017 ची मॅच फार्मसी कॉलेजच्या मैदानावर खेळली गेली. तसंच दुसऱ्या एका मॅचमध्ये 'कोल्हापूर जिल्हा एफए'च्या रामश्री आणि ज्योती मोराबले यांच्या शानदार खेळीने 'सातारा जिल्हा एफए'ला मात दिली. इतर सामन्यांत 'यवतमाळ डीएफए'ने 'बुलडाणा जिल्हा एफए'ला 1-0 ने हरवलं.

Loading Comments