मुंबईचा थरारक विजय

Rohtak
 मुंबईचा थरारक विजय
 मुंबईचा थरारक विजय
See all
मुंबई  -  

रोहतक - 41 वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईने यंदाच्या रणजी हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. शेवटपर्यंत थरारक झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईने तामिळनाडूवर दोन गडी राखून मात केली.

तिसऱ्या दिवशी तामिळनाडूने विजसासाठी दिलेल्या 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मात्र एकीकडून इतर फलंदाज धडाधड माघारी फिरत असताना अभिषेक नायरने एक बाजू लावून धरली. नायरने नाबाद 45 धावांची खेळी करत मुंबईला थरारक विजय मिळवून दिला.
तीन दिवसांत आटोपलेल्या या लढतीत मुंबईने तामिळनाडूला पहिल्या डावात 87 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर मुंबईला 176 धावाच जमवता आल्या. पहिल्या डावात 89 धावांची आघाडी घेतल्यावर मुंबईने दुसऱ्या डावातही तामिळनाडूची दाणादाण उडवली. सहा बळी टिपणाऱ्या धवल कुलकर्णीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने तामिळनाडूचा दुसरा डाव 185 धावांवर गुंडाळला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.