मुंबईत रंगणार अंध क्रिकेट थरार

 Pali Hill
मुंबईत रंगणार अंध क्रिकेट थरार

मुंबई - ब्लार्इंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन (बीडब्ल्यूओ) आणि रोटरी क्लब यांच्या वतीने 6 व्या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेचा थरार मुंबईत रंगणार आहे. 11 ते 13 जानेवारी दरम्यान विल्सन जिमखाना आणि कर्नाटक जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे रोमांचक सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघातील तब्बल 120 खेळाडू सहभागी होणार आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजता विल्सन जिमखाना येथे या स्पर्धेचा सलामीचा सामना खेळविण्यात येईल. तर, शुक्रवारी याच मैदानावर दुपारी 4.30 वाजता अंतिम सामना होईल.

Loading Comments