ठाण्याचा नुबैरशाह शेख राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेत सुवर्णपदाचा मानकरी

 Mumbai
ठाण्याचा नुबैरशाह शेख राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेत सुवर्णपदाचा मानकरी
Mumbai  -  

राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशाह शेख याने २० वर्ष गटात सुवर्णपदक पटकावले आहे. या गटात नुबैरशाहने अव्वल मानांकन मिळालेल्या शार्दुल घागरे आणि सिध्दांत महापात्राला मागे टाकून सुवर्णपदाला गवासणी घालत पदकावर आपले नाव कोरले. 

स्पर्धेतील पहिल्या दोन फे-या नुबैरशाहने उत्कृष्ट असा खेळ करत जिंकल्या. तर तिस-या फेरीत नुबैरला सिध्दांतचे आव्हान होते. सिद्धांतने पांढऱ्या सोंगट्यांनी इ ४ पद्धतीने डावाची सुरुवात केली. त्याला नुबैरशाहने बोट विनिंग पद्धतीने उत्तर दिले. मधल्या खेळात नुबैरशाहला विजयाची संधी होती. पण पटावरील परिस्थिती पाहून सिद्धांतने बरोबरी मान्य केली. तर या सात फे-यांच्या स्पर्धेत पाचव्या फेरीत नुबैरशाहचा सामना ग्रॅंडमास्टर शार्दुल गागरेशी झाला. या लढतीत नुबैरशाहने पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना निमो २० इंडियन पद्धतीने डावाची सुरुवात केली. आक्रमक खेळणाऱ्या नुबैरशाहने जादा दोन प्यादीही वाचवली होती. पण या सामन्यातही नुबैरशाहला बरोबरी मान्य करावी लागली. 

पाचव्या फेरीअखेर नुबैरशाह, शार्दुल आणि सिद्धांत चार गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर होते. सहाव्या फेरीत सिद्धांत पराभूत झाला. शार्दुलने ही फेरी जिंकली, तर नुबैरशाहची लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे या फेरीअखेर शार्दुलने पाच गुणांसह नुबैरशाहवर अर्ध्या गुणाची आघाडी मिळवली होती. निर्णायक सातव्या फेरीत शार्दुलची लढत बरोबरीत सुटली. तर नुबैरशाहने श्रीलंकेचा राष्ट्रीय विजेता डी. एम. संजुलाचा पराभव करत गुणसंख्येत शार्दुलशी बरोबरी साधली. दोघांचेही साडेपाच गुण झाल्याने सरस टायब्रेकरच्या आधारावर नुबैरशाहला विजेता घोषित करण्यात आले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments