Advertisement

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, अायेशा मोहम्मद यांची बाजी


राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, अायेशा मोहम्मद यांची बाजी
SHARES

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अाणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने रंगलेल्या चौथ्या मृणालताई गोरे व प. बा. सामंत स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विश्वविजेत्या प्रशांत मोरेने पुरुष गटाचे तर मुंबईच्या अायेशा मोहम्मदने महिला गटाचे विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांतने ठाण्याच्या नवोदित झैद अहमदचा १३-१२, ८-२५, २५-५ असा पाडाव करून विजेतेपद पटकावले. अायेशा मोहम्मदने मुंबईच्याच काजल कुमारी हिचा २-२५, २५-८, २५-४ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.


झैद अहमदची कडवी लढत

नवोदित असूनही झैद अहमदने विश्वविजेत्या प्रशांत मोरेला विजयासाठी संघर्ष करायला लावला. पहिला सेट चुरशीचा झाला. सातव्या बोर्डअखेर दोघांची गुणसंख्या १२-१२ अशी असताना अाठव्या बोर्डमध्ये प्रशांतला ब्रेक करण्याची संधी मिळाली होती. पण झैदने राणीसहित अापल्या ८ काळ्या सोंगट्या घेऊन प्रशांतला झुंजवले. अखेर शेवटच्या क्षणी प्रशांतने विश्वविजेत्याला साजेसा खेळ करत एक गुण मिळवून पहिला सेट जिंकला. दुसरा सेट झैदने जिंकून सामन्यात रंगत अाणली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये झैदची मात्रा चालली नाही.


अायेशाचा सहज विजय

महिला एकेरीचा अंतिम सामनाही तीन सेटपर्यंत रंगला. माजी राष्ट्रीय विजेत्या काजल कुमारीने अायेशा मोहम्मदला पहिल्या सेटमध्ये २५-२ असे हरवले. पण अायेशाने जोमाने मुसंडी मारत २५-८, २५-४ असे पुढील दोन्ही सेट जिंकत अजिंक्यपदावर नाव कोरले. दोन्ही गटातील विजेत्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात अाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा