• बालमोहनचे  विद्यार्थी डिएसओसाठी सज्ज
SHARE

शिवाजी पार्क - दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणा-या डिएसओ या जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धेला यंदा पावसामुळे विलंब झाला आहे. पाऊस पडल्यामुळे मैदानावर नेट लावता येणे अशक्य होते, असे असले तरी क्रिकेट खेळणारे छोटे क्रिकेटर मात्र डिएसओच्या तयारीला लागले आहेत.

बालमोहन विद्यामंदिरच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा डिएसओच्या सामन्यासाठी जोरदार सराव सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. हे सामने 15 ऑक्टोबर नंतर सुरु होतील असे प्रशिक्षकांचे मत आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर घेतले जाणारे डिएसओचे क्रिकेट सामने शालेय स्तरावरील क्रिकेटरसाठी मोठे व्यासपीठ आहे. डिएसओमध्ये अनेक नावाजलेल्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना खेळवतात. यामध्ये चांगली कामगिरी दाखवल्यास पुढे जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना खेळायची संधी मिळते. या सामन्यांमध्ये बालमोहनचे मराठी माध्यमाचे दोन संघ आणि इंग्रजी माध्यमाचे दोन संघ खेळणार आहेत - 14 वर्षाखालील एक संघ आणि 17 वर्षाखालील एक संघ असणार आहे, अशी माहिती बालमोहनचे कोच मारुती शेट्टे यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या