• रशियन मॉडेल नटालियाने दिली मुंबईतील दिव्यांग मुलांना भेट!
  • रशियन मॉडेल नटालियाने दिली मुंबईतील दिव्यांग मुलांना भेट!
SHARE

रशियाची सुपर मॉडेल आणि स्पेशल ऑलिम्पिकची बोर्ड ऑफ मेंबर असलेली नटालिया वोडियानोवा हिने स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भुलाबाई देसाई रोड येथील एसपीजी साधना शाळेतील दिव्यांग मुलांना शुक्रवारी भेट दिली. यावेळी स्पेशल ऑलिम्पिकचे महाराष्ट्राचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. एसपीजी साधना शाळेत दिव्यांग मुलांना शिक्षणासोबतच कला, कौशल्य आणि स्पेशल ओलिम्पिकसाठी तयार केले जाते.

  


नटालिया ही एक प्रसिद्ध मॉडेलच नाही, तर ती हॉलिवूड अभिनेत्री देखील आहे. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नटालिया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.यावेळी नटालियाने संपूर्ण शाळेतील सर्व मुलांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच त्यांनी काढलेली चित्रंही पाहिली. यावेळी तिने या मुलांचे भरभरुन कौतुकही केले.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या