आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताचा 'सन्मान'

  मुंबई  -  

  वरळी - बीडीडी चाळीत राहणाऱ्या सन्मान जाधवनं आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय. 21वर्षांच्या सन्माननं झारखंडमध्ये झालेल्या स्पर्धेत हे यश मिळवलंय. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.

  सन्मानच्या यशात त्याची आई कविता जाधव आणि वडिल सुशील जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. पण त्याला पॉवरलिफ्टिंगचे धडे देणारे मधुकर दरेकर यांचंही हे यश आहे. पॉवरलिफ्टिंगमध्ये आपल्या मुलानं यशाची नवनवी शिखरं गाठावीत, अशी सन्मानच्या आईची इच्छा आहे. तर स्वतः सन्मानलाही या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हायला हवा, असं वाटतंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.