• शिवनेरी संघाचा श्री समर्थला पराभवाचा धक्का
SHARE

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात दादरच्या शिवनेरी संघाने गतविजेत्या श्री समर्थला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत स्थान मिळवले. दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळ सुरू असलेल्या या स्पर्धेत दादरच्या अमर हिंद मंडळाने मुलींमध्ये अंतिम फेरी गाठली.


अटीतटीच्या उपांत्य लढतीत, शिवनेरी संघाने दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संघावर १६-१० असा सहा गुणांनी विजय मिळवला. जवळपास १० वर्षांनंतर श्री समर्थला प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शिवनेरीकडून प्रतिक्षा महाजन (६ गडी ), शिवानी गुप्ता (१:१० मि. व २:१० मि. संरक्षण व ३ गडी) साईली म्हैसधुणे  (१:१०, ३:३० मि. व १ गडी)  व प्रगती ढाणे  (१:५० मि. ३ गडी) यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात, अमर हिंद मंडळानं सरस्वती कन्या संघावर ५-४ असा थरारक विजय मिळवला. अमर हिंदकडून संजना कुडव (४:२०, ४:२० मि. नाबाद संरक्षण ), रिद्धी कबीर (३:१०, २:१० मि. संरक्षण व २ गडी ) यांनी सुरेख खेळ केला.


कुमारांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र अंतिम फेरीतकुमारांच्या उपांत्य फेरीत विद्यार्थी क्रीडा केंद्राने अमर हिंद मंडळाचा प्रतिकार १०-९ असा मोडीत काढला. अजय मकवानाने ६ गडी बाद करत विद्यार्थीला विजय मिळवून दिला. त्याला  रसाळ प्रेम (३:१०, १:०० मि. संरक्षण ) व ऋषिकेश पडेळकर (०:५०, २:४० मि. संरक्षण व १ गडी) यांनी साथ दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या