SHARE

प्रबोधन अांतरशालेय क्रीडा महोत्सवात अॅथलेटिक्समध्ये तब्बल सहा स्पर्धाविक्रमांची नोंद झाली. दहिसरच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्वा कनाल हिने अाठ वर्षांखालील गटात, लांब उडीमध्ये ३.०९ मीटर झेप घेत नव्या स्पर्धाविक्रमाची नोंद केली. तिने यापूर्वीचा २.८९ मीटरचा स्पर्धाविक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला. त्यापाठोपाठ विक्रमांची नोंद करण्यात मुलींची संख्या सर्वाधिक होती. मुलांमध्ये फक्त एका स्पर्धाविक्रमाची नोंद झाली. खेतान इंटरनॅशनल स्कूलच्या नमन कनोई याने १६ वर्षांखालील मुलांच्या गटात १५.३६ मीटर इतका गोळाफेक करत हा विक्रम नोंदवला.


प्रिया गुप्ता, हर्षिता गुप्ता यांचेही विक्रम

मुलींच्या १४ वर्षांखालील गटात गोकुळधाम शाळेच्या प्रिया गुप्ता हिने ८० मीटर अडथळा शर्यतीत १२.४५ सेकंद अशी कामगिरी नोंदवत स्पर्धाविक्रम रचला. त्याचबरोबर हर्षिता शेट्टी (लोखंडवाला) हिनेही थाळीफेक प्रकारात ३१.०५ मीटर अशी विक्रमी कामगिरी केली. सिया सावंत (लक्षधाम) हिने ३०० मीटर शर्यतीत ४८.७ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. स्पर्धेतील सहावा विक्रम ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये नोंदवला गेला तोही मुलींकडूनच. १४ वर्षांखालील वयोगटात गोकूळधाम हायस्कूलने ५८.८ सेकंद अशी वेळ देत हा स्पर्धाविक्रम रचला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या