Advertisement

श्री रवीशंकर विद्या मंदिरमध्ये क्रिडादिन


श्री रवीशंकर विद्या मंदिरमध्ये क्रिडादिन
SHARES

कांदीवली - समता नगरमधील भारतीय खेळ प्राधिकरण मैदानात श्री रवीशंकर विद्यामंदिराच्या वतीने 8 वा वार्षिक क्रिडादिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळ खेळण्यात आले. मागील दोन दिवसांपासून सुरु असणारी ही स्पर्धा बुधवारी संपन्न झाली. या खेळात सुमारे 1300 मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये लांब उडी, कबड्डी, धावणे यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्पर्धेचा आनंद लुटल्याचे कॉलेजच्या प्राध्यापिका रेखा कपूर यांनी सांगितले. तसेच खेळामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा