Advertisement

प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धा


प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धा
SHARES

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त २० ते २३ डिसेंबरदरम्यान प्रभादेवीतील चवन्नी गल्लीत राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेचं अायोजन करण्यात अालं अाहे. या स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, पुणे, रत्नागिरी, सांगली अाणि पालघर या जिल्ह्यातील १२ अव्वल संघांचा समावेश असणार अाहे. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीनं खेळवली जाणार असून विजेत्याला २५ हजार रुपये तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपयांचं बक्षिस देऊन गौरवण्यात येणार अाहे.


सर्वोत्तम खेळाडूला मोबाईल, सोन्याचं नाणं

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला मोबाईल बक्षिस देण्यात येणार असून सर्वोत्तम चढाईपटू अाणि बचावपटूला सोन्याचं नाणं देण्यात येणार असल्याचं मंडळाचे प्रमुख सचिव महेश सावंत यांनी सांगितलं. प्रत्येक दिवसाच्या मानकरीला एक हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.


मनोहर जोशी, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी अाणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना खासदार संजय राऊत, माजी राज्यमंत्री सचिन अहिर व माजी महापौर विशाखा राऊत उपस्थित राहणार अाहेत.


स्पर्धेची गटवारी अशी असेल?

अ गटात पिंपळेश्वर (मुंबई), जय शिव (ठाणे, यंग प्रभादेवी (मुंबई) या संघांना तर ब गटात सिद्धीप्रभा (मुंबई), वाघजाई (रत्नागिरी), संघर्ष (उपनगर) या संघांना स्थान देण्यात अाले अाहे. क गटात गोल्फादेवी (मुंबई), उत्कर्ष क्रीडा (पुणे), श्रीराम (पालघर) तर ड गटात न्यू उत्कर्ष (सांगली), स्वस्तिक (उपनगर) अाणि अोम ज्ञानदीप (मुंबई) या संघांचा समावेश असेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा