Advertisement

यंदाचा 'नवोदित मुंबई श्री'चा मानकरी कोण? जाणून घ्या...


यंदाचा 'नवोदित मुंबई श्री'चा मानकरी कोण? जाणून घ्या...
SHARES

'मुंबईच्या राजाचा विजय असो'... 'अंधेरीच्या राजाचा विजय असो', अशा घोषणांनी गणेशगल्ली दुमदुमून निघाली. पण आता तर गणेशोत्सव नाही. त्यामुळे अशी घोषणाबाजी का करण्यात आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरेतर हा उत्साह होता नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा. यावेळी नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव या स्पर्धेत अंधेरी येथील फॉर्च्युन फिटनेसच्या सुयश पाटीलने विजय मिळवल्यानंतर शरीरसौष्ठवप्रेमींनी चक्क 'अंधेरीच्या राजाचा विजय असो' अशी घोषणा करत आनंद व्यक्त केला.


220 नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग

यंदा ही स्पर्धा गणेश गल्लीत पार पडली. शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती. या स्पर्धेत तब्बल 220 नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग होता. या मोसमातील संघटनेची ही पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे शहर आणि उपनगर या दोन्ही संघटनांनी जोमाने तयारी केली होती.


प्रत्येक गटात 40-45 खेळाडूंचा सहभाग

प्रत्येक गटात 40-45 खेळाडूंचा सहभाग होता. यातून आधी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये परब फिटनेसच्या किशोर राऊत, नितीन रुपाले हे दोन खेळाडू गटविजेतेपदाते मानकरी ठरले. तर परळच्या हर्क्युलस जिमचा समीर भिलारे हा उत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला.


नवोदित मुंबई श्रीचा निकाल असा

  • 55 किलो वजनी गटात - 1. किशोर राऊत (परब फिटनेस), 2. अविनाश वणे (पॉवर ऍड), 3. ऋषिकेश परब ( कृष्णा जिम), 4. अजिंक्य पवार (बाल व्यायामशाळा), 5. उपेंद्र पांचाळ (आर.एम.भट)
  • 60 किलो वजनी गटात - 1. साजिद मलिक (हार्डकोर), 2. आकाश घोरपडे (स्लिमवेल), 3. तुषार गुजर (मातोश्री), 4. गिरीष मुढे (बॉडी वर्पशॉप), 5. गोपाळ सोनार (सॅमच्युन).
  • 65 किलो वजनी गट - 1. विनायक गोळेकर ( मातोश्री), 2. चेतन खारवा ( ग्रो मसल), 3. आदेश चिंचकर (आर.एम.भट), 4. कौशल खाडे (एम फिटनेस), 5. प्रज्योत जाधव (मसल ऍण्ड माइंड).
  • 70 किलो वजनी गट - 1. सुजीत महापत (लीना मोगरे), 2. महेश पवार (पॉवर जिम), 3. आशिष लोखंडे ( आर.एम.भट), 4. निनाद जाधव (बॉडी वर्पशॉप), 5. प्रशांत शिर्के (माँसाहेब).
  • 75 किलो वजनी गट -1. समीर भिलारे ( हर्क्युलस जिम), 2. अमोल जाधव ( गुरूदत्त जिम), 3. कल्पेश मयेकर ( परब फिटनेस), 4. गणेश सावंत (सालम जिम), 5. संतोष भेंडू (परब फिटनेस).
  • 80 किलो वजनी गट- 1. सुयश पाटील (फॉरच्युन फिटनेस), 2. सिद्धीराज परब ( रिगल जिम), 3. रोहन कांदळगावकर ( फोकस फिटनेस), 4. शहाजी चौगुले (मेघाली जिम), 5. कपिल नालगुडे (गुरूदत्त).
  • 80 किलोवरील वजनी गट - 1. नितीन रुपाले (परब फिटनेस), 2. रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), 3. जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस), 4. निलेश रेमजे (क्रिएटर जिम), 5. अक्षय माँगटी (सालम जिम).


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा