• वसई-विरार मॅरेथाॅन शर्यतीत स्वाती गाढवे विजेती
SHARE

डीजे-ताशाचीी झिंग, सकाळच्या वेळी पडलेलं धुकं, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यासह रविवारी रंगलेल्या वसई-विरार महापौर मॅरेथाॅन शर्यतीत मुलींच्या गटात रेल्वेच्या धावपटूंनी वर्चस्व गाजविले. मध्य रेल्वेच्या स्वाती गाढवे हिने चिंता यादव अाणि मोनिका राऊत या रेल्वेच्या धावपटूंचेच अाव्हान मोडीत काढत महिलांच्या अर्धमॅरेथाॅन गटाचे विजेतेपद पटकावले. मुंबई मॅरेथॉनची विजेती स्वाती गाढवे हिने १ तास १८ मिनिटे आणि २६ सेकंद अशी वेळ देत बाजी मारली. चिंता यादव हिने १.१९.०७ सेकंद अशी वेळ देत दुसरे स्थान तर रेल्वेच्याच मोनिका राऊतने १.२०.२३ सेकंदासह तिसरे स्थान प्राप्त केले.


पुरुषांच्या पूर्ण मॅरेथाॅनमध्ये करण सिंग विजयी

दुखापतीमुळे दोन वर्षे एकही शर्यतीत सहभागी होऊ न शकलेल्या करण सिंगने राष्ट्रीय विजेत्या रशपाल सिंगला धूळ चारली अाणि पुरुषांच्या पूर्ण मॅरेथाॅनच्या विजेतेपदासह २.५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. करणने २ तास २४.२६ सेकंद अशी वेळ नोंदवली. .२४.३२ सेकंद अशी वेळ नोंदवणाऱ्या मोहितला अखेर दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय विजेत्या रशपाल सिंगने २.२७.५६ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.अर्धमॅरेथाॅनमध्ये अंकित मलिकची बाजी

पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन गटात, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूपच्या अंकित मलिक याने १.०५.५६ सेकंद अशी वेळ देत बाजी मारली. पुण्याच्या अार्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या प्रदीप सिंगने १.०७.१३ सेकंदासह दुसरे तर शंकर मान थापा याने १.०७.२८ सेकंद अशी कामगिरी नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या