Advertisement

रोहित शर्मा... 17 वर्षां आधीही चॅम्पियन आणि आजही!

2007 आणि 2024 या दोन्ही वर्ल्डकपच्या वेळी रोहित शर्मा संघात होता.

रोहित शर्मा... 17 वर्षां आधीही चॅम्पियन आणि आजही!
SHARES

भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी विश्वचषक ट्रॉफी घेऊन दिल्ली विमानतळावर उतरला. मैदानावर समोरून नेतृत्व करणारा कर्णधार रोहित शर्मा येथेही आपल्या संघाचे नेतृत्व करत होता. रोहित शर्मा एका हातात वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन विमानतळावर चालला होता.

विशेष म्हणजे 17 वर्षांपूर्वीही भारतीय संघ याच शैलीत मुंबई विमानतळावर उतरला होता. 2007 चा चॅम्पियन संघ आणि सध्याचा संघ यांच्यात फक्त एक गोष्ट समान आहे. रोहित शर्माही त्या संघात होता आणि याही संघात आहे. तेव्हा तो संघात खेळाडू होता. पण आज तो स्वत: टीमचे कर्णधार पद भूषवत आहे.   

2007 मध्ये जेव्हा भारताने पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्मा चॅम्पियन संघाचा सर्वात तरुण सदस्य होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत भारताने विजेतेपद पटकावले. भारताला T20 विश्वचषक जिंकून देणारा एमएस धोनी पहिला कर्णधार ठरला.

2007 च्या चॅम्पियन संघाचे खेळाडू एक एक करून निवृत्त झाले, पण रोहित शर्माने आपला खेळ सुरूच ठेवला. आज तो टीम इंडियाचा सर्वात जुना सदस्य आहे. समोरून संघाचे नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूच्या खेळावर वयाचा प्रभाव नाही.

29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने T20 विश्वचषक जिंकला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारत, दक्षिण आफ्रिका आणि T20 विश्वचषक ट्रॉफी यांच्यात एक अद्भुत योगायोग आहे. भारताने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा दक्षिण आफ्रिका यजमान होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला.



हेही वाचा

मुंबईत T-20 World Cupची विजयी परेड, जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

IND Vs SA, T20 विश्वचषक 2024: दक्षिण आफ्रिकेला हरवून भारत बनला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा