Advertisement

पालिका शाळेतील युवा फुटबॉलपटूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षणाची संधी


पालिका शाळेतील युवा फुटबॉलपटूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षणाची संधी
SHARES

एकीकडे मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना दुसरीकडे फुटबॉल क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एमडीएफए) अाणि फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने अाता पालिका शाळांमधील गुणी फुटबाॅलपटूंना थेट जर्मनीत जाऊन प्रशिक्षणाचे धडे गिरवण्याची संधी मिळणार अाहे.


'रोड टू जर्मनी'

फुटबाॅल क्लब अाॅफ इंडियाने 'रोड टू जर्मनी' हा कार्यक्रम आणला असून त्याद्वारे महापालिकेच्या शाळांमधील गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. इतकंच नव्हे तर त्यांना थेट जर्मनीला जाऊन प्रशिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये निवड चाचणी सुरू असून २८ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर, नागपूर, पुणे येथून १२ वर्षांखालील गुणी फुटबॉलपटूंचा शोध घेतला जाणार आहे. त्यातून निवडलेल्या गुणी खेळाडूंच्या तुकडीला जर्मनीत जाऊन फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. भारतात आल्यानंतरही त्यांना त्याच पद्धतीचं प्रशिक्षण मायदेशातही दिलं जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविला जाणार आहे.


‘फुवेको’ सॉफ्टवेअरमध्ये खेळाडूंची इत्यंभूत माहिती

जर्मनीमध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘फुवेको’ फुटबॉल डेव्हलपमेंट सॉफ्टवेअरमध्ये युवा खेळाडूंच्या प्रशिक्षणाची, फिटनेससंबधीची इत्यंभूत माहिती असेल. मुलांसह त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांना कोणत्याही क्षणी ऑनलाईनद्वारे ही माहिती पाहता येईल. सध्या हे सॉफ्टवेअर इंग्रजी भाषेत असलं तरी हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, पंजाबी, बंगाली या भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून दिलं जाणार आहे.


जर्मनीप्रमाणेच फुटबॉलमध्येही भारताची प्रगती व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ‘रोड टू जर्मनी’ कार्यक्रम म्हणजे फुटबॉलमध्ये प्रावीण्य असलेल्या देशात जाऊन फुटबॉलचे प्रशिक्षण घेणे. फुटबॉल हा माझा आवडता खेळ असून भारतातील युवा फुटबॉलपटू जर्मनीत जाऊन आल्यानंतर या खेळात आपली चमक दाखवतील, अशी आशा आहे.
- डॉ. जर्गन मोरहार्ड, जर्मन वाणिज्य दूतावास

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा