टीम इंडियाच्या फिटनेस ट्रेनरचा संशयास्पद मृत्यू

Nariman Point
टीम इंडियाच्या फिटनेस ट्रेनरचा संशयास्पद मृत्यू
टीम इंडियाच्या फिटनेस ट्रेनरचा संशयास्पद मृत्यू
See all
मुंबई  -  

नरिमन पॉइंट - भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाचे फिजिकल फिटनेस ट्रेनर राजेश सावंत(40)  यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. रविवारी सकाळी राजेश सावंत यांचा मृतदेह नरिमन पॉइंट इथल्या ट्रायडंट हॉटेलच्या एका रूममध्ये सापडला. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या भारतीय अंडर 19 चा चमू हा इंग्लंड अंडर 19 विरुद्ध सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांसाठी सराव करत आहे. 

रविवारी सकाळी राजेश सावंत हे सरावादरम्यान हजर नव्हते त्यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नसल्याने त्यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील रूम क्रमांक 1811ची पाहणी केली असता बेडवर त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.