Advertisement

बाॅम्बे गोल्ड कप हाॅकीत पश्चिम रेल्वेचा इंडियन नेव्हीवर थरारक विजय


बाॅम्बे गोल्ड कप हाॅकीत पश्चिम रेल्वेचा इंडियन नेव्हीवर थरारक विजय
SHARES

दोन वेळा पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम रेल्वे संघाने जाेमाने पुनरागन करत इंडियन नेव्ही संघावर ३-२ असा थरारक विजय मिळवला. चर्चगेट येथील एमएचएएल-महिंद्रा स्टेडियमवर सुरू असलेल्या बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेत पश्चिम रेल्वेने शेवटच्या क्षणी दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.


जुगराज सिंग (७व्या मिनिटाला) याने पेनल्टी काॅर्नरवर गोल करून इंडियन नेव्हीला अाघाडी मिळवून दिली. मात्र अमित रोहिदासने शाॅर्ट काॅर्नरवर ४०व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे पश्चिम रेल्वेने सामन्यात पुनरागमन केलं. मात्र राणा प्रतापच्या मैदानी गोलमुळे इंडियन नेव्हीने पुन्हा एकदा ४४व्या मिनिटाला अाघाडी घेतली.


अखेरच्या सत्रात पश्चिम रेल्वेचे दोन गोल

पश्चिम रेल्वेचा संघ हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. सामन्यात दमदार हाॅकीचे प्रदर्शन करत पश्चिम रेल्वेने अापल्या अाशा जिवंत ठेवल्या होत्या. रेल्वेने जोरदार हल्ले चढवत इंडियन नेव्हीचा बचाव खिळखिळा केला, त्यामुळे ६४व्या मिनिटाला रजिन कांडुलना याने गोल करत पश्चिम रेल्वेला बरोबरी साधून दिली. चार मिनिटानंतर सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत नीलकंठ शर्माने गोल करत पश्चिम रेल्वेच्या विजयावर नाव कोरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा