Advertisement

युसिमसचा बक्षीस समारंभ


युसिमसचा बक्षीस समारंभ
SHARES

दादर - ज्या मुलांना गणिताची भीती वाटते अशा मुलांसाठी युसिमस ही संस्था काम करते. 1993 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या जगभरात अनेक शाखा आहेत. 8 मिनिटांत 200 गणितं अशा अफाट वेगानं काम करणारी ही 4 ते 11 वयोगटातील मुलं कठीणातलं कठीण गणित अगदी आरामात सोडवतात. अशा मुलांची 11 डिसेंबर रोजी मुंबईत स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अधिक वेगात अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचा शनिवारी सावरकर स्मारक दादर येथे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला नगरसेवक अनिल त्रिंबकर, आईएस न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती हजारे, भानू राजपूत सी. बी. एस डायरेक्टर यांनी प्रमूख उपस्थिती दर्शवली. या वेळी हर्ष पाले (listening 2 अंकी 40 row competition winner) ट्रॉफी सर्टिफिकेट आणि 5000 चं कॅश बक्षीस, श्रेया चव्हाण (5th level winner) ट्रॉफी certificate आणि 5000 कॅश बक्षीस , मयंक रांगडे (state level listening कंपिशन winner ) ट्रॉफी सर्टिफिकेट आणि 5000 च कॅश बक्षीस अशी 3 महत्वाची बक्षीसं देण्यात आली. त्याचबरोबर 150 हून अधिक मुलांना गौरवण्यात आले.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा