Advertisement

डोंबिवलीच्या यश आणि ओमकारची चमकदार कामगिरी


डोंबिवलीच्या यश आणि ओमकारची चमकदार कामगिरी
SHARES

डोंबिवलीच्या यश पवार आणि ओमकार कारेकर या दोघांंनी आपल्या शानदार खेळाच्या जोरावर ४२ व्या बॉम्बे वायएमसीए स्टेट लेव्हल अॅथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत विजय मिळवला. हे दोन्ही खेळाडू विनर्स क्लबकडून ११० मीटरच्या हर्डल्स स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा चर्नीरोड येथील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर खेळवण्यात आली होती.



या स्पर्धेत तीन नवीन रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. मुंबईच्या स्पाडॉन इको फाऊंडेशनच्या आदिनाथ भोसले याने ५००० मीटर अंतर धावणे स्पर्धेत १५.७ सेकंदाची नोंद करत नवीन विक्रम आपल्या नाववर केला. डोबिंवलीमधील विनर्स कल्बच्या यश पवारने ११० मीटर अंतराच्या हर्डल्स प्रकारात १५.३ सेकंदाची वेळ नोंदवली. ठाण्यातील इंडिया मास्टरच्या तेजस डोंगरे याने ३८.२४ मीटरच्या डिसकस थ्रो प्रकारात अव्वल स्थान मिळवले.



इको फाऊंडेशनच्या स्नेहल हिरने हिने महिलांच्या ५००० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आणि १८ वर्षांखालील वयोगटात १५०० मीटर धावणी प्रकारात आकांक्षा शेलार हिने विजय मिळवला. यामध्ये इको फाऊंडेशनने एकूण तीन सुवर्ण पदकांची कमाई करत आपला दबदबा कायम राखला. मुलींच्या १४ वर्षांखालील गटात गोरेगावच्या गोयंका ट्रस्टमधील नुपूर कुंभार हिने २०० मीटर धावणेमध्ये विजय मिळवला. १६ वर्षांखालील गटात एेरोलीच्या फातिमा एससीच्या एग्रता मेलकुंडे हिने शॉट पुट प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा